संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहे, तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना जमीन घोटाळ्याप्रकरणात ईडीने समन्स बजावला आहे. आज दुपारी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार आहेत.