शेतकऱ्यांचा संघर्ष योध्दा: शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी इंदापूर तालुक्यातील सुपुत्र पांडुरंग रायते यांची नियुक्ती.

शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदी पांडुरंग रायते यांची नियुक्ती झाली आहे. पांडुरंग रायते हे या अगोदर पुणे जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांनाही न्याय मिळू लागला .त्यांनी जिल्हाध्यक्ष असताना वेगवेगळ्या ठिकाणी कुठे ना कुठे रोज शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने उभे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची एकजूट घडवून आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार आहेत.त्यांनी आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची एकजूट करून आंदोलने यशस्वी केली आहेत. सामाजिक बांधिलकी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंबंधी असणारी जाणीव तळमळ व त्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा याचीच दखल घेऊन शेतकरी संघटनेचे नेते मा.रघुनाथ दादा पाटील यांनी त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती केली. शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी लढत असते. शेतकऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी एकजुटीने शेतकरी संघटनेत येऊन काम करावे तरच शेतकरी हा टिकणार आहे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्युज तर्फे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पांडुरंग रायते यांनी केले आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here