निमगाव केतकी: दि ३ नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश संपादन करून सहावी ते बारावी शिक्षणासाठी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेल्या श्रेयशी भोंग , अर्णव भोंग व सार्थक भोंग यांचा शिक्षक समितीच्या वतीने निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे सत्कार करण्यात आला. तीनही यशस्वी मुलांचा फेटा , पुष्पहार , लेखन साहित्य देवून शिक्षक समितीच्या पदाधिकारी व शिक्षकांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रसंगी यशस्वी मुलांना शुभेच्छा देण्यासाठी दत्ताञय चांदणे , किरण म्हेञे , बापूराव जाधव , सतिश भोंग यांनी मनोगत व्यक्त केली. मुलाचे पालक सतिश भोंग , संजय भोंग , निलिमा भोंग , बबन भोंग यांचाही सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभासाठी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्ताञय चांदणे , सेवानिवृत्त शिक्षक आबा लामतुरे , जिल्हा सोसायटी चेअरमन तथा संचालक अरूण मिरगणे , शिक्षक सोसायटी इंदापूर माजी चेअरमन तथा संचालक किरण म्हेञे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , शिक्षक समितीच्या महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग , बापूराव जाधव , अतुल जौंजाळ , अजिनाथ आदलिंग , भुषण जौंजाळ , किरण लंगोटे , राहुल बनसुडे , सुनिल पवार ,नंदकुमार सूर्यवंशी , विकास वाघ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले.आभार भुषण जौंजाळ यांनी मानले.