श्री हनुमान विद्यालय अवसरीचे चेअरमन अरुण (दादा ) साधू शिंगटे यांच्या मातोश्री कासाबाई साधू शिंगटे यांचे २|११|२०२२ रोजी दुःखद निधन झाले, या दुःखद निधनाची बातमी कळताच पूर्ण अवसरी पंचक्रोशित शोककळा पसरली, आणि शिंगटे कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले .अतिशय कठीण परिस्थितीला दोन हात करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा सुखी कुटुंब असा विस्तार केला. अवसरी मध्ये त्यांना कासा-आजी या नावाने सर्वजण ओळखत असे, त्यांच्या मागे आता एक मुलगा अरुण (दादा )साधू शिंगटे व पाच मुली व सुनबाई विजया अरुण शिंगटे तसेच सात नाती व नऊ नातवंडे व परतंवडे असा मोठा परिवार आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून कै. कासाबाई साधू शिंगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.