श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी ग्रामदैवत श्री हनुमानाच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक लोंढे सर आणि योगशिक्षक श्री चंद्रकांतनाना देवकर सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री रसाळ सर यांनी प्रास्ताविक करताना योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी योगदिनाच्या निमित्ताने योगशिक्षक श्री देवकर सर यांनी अत्यंत सुंदर व मनोरंजक पध्दतीने संचलन करीत विविध प्रकारची योगासने, प्राणायाम आणि झुंम्बा नृत्य आदी प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली.व मुलांना योग्य पद्धतीने योगाचे धडे दिले त्यांच्याकडून सर्व योगासने करवून घेतली. शेवटी योगासनांची जीवनातील महत्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले. नंतर मान्यवरांचा सत्कार केला शेवटी श्री घळके सर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक श्री लोंढे सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.