श्री स्वामी समर्थांच्या पादुका इंदापूर शहरात दर्शनासाठी दाखल होणार.

इंदापूर:अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित सद्गुरु परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरातील मयूर हौसिंग सोसायटी आवारात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती अवतार व पादुका पुजन ( दि २६ डिसेंबर ) सकाळी १० वाजता इंदापूर शहर सेवेकरी भाविकांसाठी दिंडोरी प्रणित विजयरथाचे शुभ आगमन होणार आहे. इंदापूर शहर व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.अशी माहिती यावेळी स्वामी समर्थ केंद्र इंदापूर ज्येष्ठ सेवेकरी प्रदीप भागवत यांनी दिली. या वेळी विकास खिलारे, शिवतेज दडस, अजित पोतदार, युवराज जगताप, सोमनाथ तारगावकर, नामदेव चित्राव, नितीन देवकर पाटील, पंचकमिटी, विभाग प्रतिनिधी, दरबार प्रतिनिधी, तसेच पुरुष व महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here