श्री समर्थ महिला पतसंस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान..

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ महिला पतसंस्थेतर्फे कर्तुत्ववान महिलांना सोलापूरचे सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातून दमानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मला भोसले, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. सारिका होमकर, पत्रकारिता आर. जे पल्लवी गंभीरे(92.7 fm), व्यावसायिक क्षेत्रातून रूपाली बावळे, व व्यवसाय करत दहावी मध्ये सोळा नंबर फॉर्म जिल्ह्यामध्ये प्रथम विजयलक्ष्मी बुटला. यांना पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगतात डॉ. वैशाली साळवे मॅडम म्हणाल्या की, “ही महिलांची महिलांसाठी सुरू केलेली पतसंस्था आहे परंतु ही एक सर्व महिलां संचालकांना एक संधी व स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ आहे.महिलांनी आपले घर तर संभाळावेच परंतु त्याबरोबर बाहेरही पडून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. तुमच्या सर्व पुरुष मंडळींनी तुमच्या पाठीशी उभा राहून चांगली संधी दिलेली आहे त्याचे सोने करा.अल्पावधीतच पतसंस्थेची झालेली प्रगतीबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले व पुढच्या महिला दिना पर्यंत 25 कोटी ठेवी व्हाव्यात असे उद्दिष्ट ठेवा” असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संचालिका सौ सुवर्ण भोसले यांनी केले तर संस्थेच्या प्रगतीचा आलेख अध्यक्ष सौ नीता दिनकर देशमुख यांनी मांडला.संस्थेच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 12 कोटी ठेवी, 65 लाख भाग भांडवल,6 कोटी कर्जे तर एकूण व्यवसाय 18 कोटीचा झाल्याचे सांगितले. यासाठी बऱ्याच महिलांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. आपल्या मनोगत मुख्याध्यापिका सौ निर्मला भोसले मॅडम म्हणाल्या की “या सर्व महिला संचालकांच्या मागे त्यांचे पतींचा खंबीर आधार आहे. सर्वांना मी गेल्या पंधरा वर्षापासून ओळखते सर्वांचा प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी, सर्वांना आपुलकीची वागणूक यामुळेच पतसंस्था लगेच नावारूपाला आली. अशीच पतसंस्थेची प्रगती होवो” अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष श्री दिनकर देशमुख यांची सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या संचालक पदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचे हस्ते सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष सौ रेणुका कोरे यांनी मानले. यावेळी संचालिका सौ संगीता महावीर जाधव सौ मनीषा साठे, व्यवस्थापन मंडळ उपाध्यक्ष महावीर जाधव, संतोष भोसले, संजय साळुंखे, बापू साठे,प्रमोद यादव पिग्मी एजंट अजित चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली थिटे यांनी केले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here