श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी.

इंदापूर : आज 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन निमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख मॅडम होत्या.शाळेमधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित काही कविता सादर केल्या.तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषण केले तर काहींनी नाटक सादर केले.तसेच सिनियर केजी ते चौथीपर्यंतच्या काही विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेली होतीकाही विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.श्री नितीन भोसले सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्यान दिले .तसेच काही पालकांनी सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षक यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव केला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी सर्व विद्यार्थिनींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.सौ प्रियंका गोलांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शनपर भाषण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना मोदळे व श्री तानाजी नरुटे सर यांनी केले.सौ सपना घसे यांनी आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here