भोडणी: इंदापूर तालुक्यातील भोडणी या गावची प्रसिद्ध असणारी श्री नाथ यात्रेनिमित्त भोडणी ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धा रविवार दि. 8/5 /2022 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून चालू होणार आहे ,तरी सर्व क्रिकेट शौकिनांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे भोडणी ग्रामस्थ यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे, तसे पहिले तर भोडणी हे गाव पहिल्यापासूनच क्रिकेट प्रेमी म्हणून ओळखले जाते, या अगोदर भोडणी या गावामध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते, परंतु यावर्षी श्रीनाथ यात्रेनिमित्त ग्रामस्थ यांच्यावतीने भोडणी प्रीमियर लीग क्रिकेटचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धेत फक्त भोडणी या गावातीलच क्रिकेटप्रेमी सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेसाठी सचिन (बापू) चौधरी, अनिल किसन चव्हाण, विष्णू नारायण हांगे, लक्ष्मी मेडिकल वकीलवस्ती ,प्रशांत नानासाहेब गोसावी, या ग्रामस्थांच्यावतीने स्पर्धेसाठी पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे इतर ही खुप उत्तेजनार्थ बक्षिसे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणार आहेत .या स्पर्धेचे संयोजक विजय खटके (पोलीस पाटील ),डॉ. तेजस हांगे, संदीप गोसावी ,आणि विकी पवळ आहेत, या स्पर्धेसाठी ट्राॅफी ही कै. तुषार सानप महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे.