इंदापूर: श्री नरसिंह प्रासादिक गणेश उत्सव मित्र मंडळ श्री संत नामदेव मंदिर कासार पट्टा यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत व गणेश उत्सवा निमित्त मंडळाच्या 101 व्या स्थापना वर्षा च्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक 18 सप्टेंबर 20 21 रोजी इंदापूर नगरीच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा व श्री मुकुंद शेठ शहा सचिव इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याहस्ते सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
आज जागतिक बांबू दिनानिमित्त नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्या हस्ते बांबूचे रोपटे लावून वृक्षारोपनास सुरुवात करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षमित्र श्री चंद्रकांत देवकर,सुनील शिरसठ विद्यालयाचे शिक्षक सुनील मोहिते सर नगरपरिषदेचे श्री अल्ताफ पठाण यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष श्री भरत देशमाने तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अशोक चिंचकर, श्री अमर लेंडवे, गौरव गानबोटे,अनिकेत गानबोटे,योगेश देशमाने,राहुल गानबोटे,गणेश भोज व इतर कार्यकर्ते तसेच लहान कार्यकर्ते यांनी वृक्षारोपण केले आणि वसुंधरेची शपथ घेतली.