निमगाव केतकी: श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी या विद्यालयांमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अध्यापक श्री राऊत व्ही. बी .सर यांची पर्यवेक्षक श्री खान सर यांनी अध्यक्ष म्हणून निवड केली.शिक्षिका श्रीमती उदमले योगिता यांनी अनुमोदन दिले.विद्यालयाचे प्राचार्य श्री चव्हाण आर .डी .तसेच उपप्राचार्य श्री भोंग एमबी पर्यवेक्षक श्री खान सर तसेच निमगाव पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.इयत्ता नववी अ चा विद्यार्थी आदित्य पाटील यांनी महापुरुषांबद्दल आपले विचार इंग्रजीतून मांडले तसेच विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती माळी सुनीता व उपशिक्षक श्री भोसले उपदेश यांनी आपले महापुरुषांबद्दलचे मनोगत विद्यार्थ्यांसमोर मांडले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती कदम मॅडम यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ मिसाळ एम .एस. यांनी केले.