श्री केतकेश्वर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा. वाचा सविस्तर

इंदापूर (प्रतिनिधी:मायादेवी मिसाळ): इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या विद्यमाने सन 2021-22 गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी इंदापूर तालुका विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी तालुक्यातील गुणवंत शाळेतील गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव केतकी या विद्यालयातील सौ वैशाली बाबासाहेब सावंत या विज्ञान विषयाच्या शिक्षिका यांना गुणवंत शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले व तो पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला .इयत्ता नववी दहावी या वर्गांना मागील बारा वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री केतकेश्वर हायस्कूल या ठिकाणी विज्ञान विषया चे अध्यापन करीत आहेत.
यावेळी श्री विजयकुमार परीट साहेब (गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर) श्री विक्रम साळुंखे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंद नगर पोलीस स्टेशन) श्री नंदकुमार सागर (अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ )(सचिव श्री प्रसाद गायकवाड )या मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.त्याचबरोबर श्री गणेश घोरपडे ,घोरपडे श्री जगन्नाथ पाटील, श्री रामराव पाडुळे ,हेही यावेळी उपस्थित होते. श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकीचे मुख्याध्यापक श्री आर .डी. चव्हाण सर उपमुख्याध्यापक श्री एम. बी. भोंग ,सर पर्यवेक्षक श्री खान सर व सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे वतीने सौ सावंत मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here