निमगाव केतकी येथे श्रीराज (भैय्या) दत्तात्रेय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विनामूल्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर शनिवार दि.2/12/ 2023 रोजी सकाळी ठीक 9ते 5 वाजेपर्यंत निमगाव केतकीमध्ये बुधराणी हॉस्पिटल पुणे व अमोल भैया राऊत व निमगाव केतकी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे तसेच मोफत कॉम्पुटर मशीनद्वारे डोळ्यांची तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती अमोल भैय्या राऊत मित्रपरिवाराने दिली आहे. निमगाव केतकी येथील सर्व गरजू व्यक्तींनी वेळेत निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकीमध्ये हजर राहून या नेत्र तपासणी शिबिराचाही आवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही अमोल भैय्या राऊत मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.या महाशिबिरामध्ये नाक घसा तपासणी,रक्त तपासणी,बीपी शुगर,एसीजी तपासणी,सांधेदुखी व हाडाचे मणक्याचे विकार व शस्त्रक्रिया,भव्य रक्तदान शिबिर,आयुष्मान भारत हेल्थ कार्ड,आबा कार्ड हेल्थ,अल्प दरात आधार कार्ड दुरुस्ती व लिंकिंग करण्याचे सुविधा आहे तसेच या शिबिरामध्ये इतरही ऑपरेशनचे फॉर्म भरले जाणार आहेत. या शिबिरामध्ये मोफत कॉम्प्युटर मशीनद्वारे डोळ्यांची तपासणी होणार आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या सहयोगाने दिली जाणार आहे, गरजू व्यक्तींना अल्प दरात चष्म्याचे वाटप सुद्धा होणार आहे तसेच तपासणीला येताना जर जुना चष्मा असेल तर तो सोबत घेऊन यावा असे आवाहन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये चष्म्याचा नंबर कमी अथवा जास्त झाला आहे हे तपासून मिळेल.तपासणीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड याची आवश्यकता लागणार आहे. शिबिर वेळेत चालू व वेळेतच बंद होईल.तरी निमगाव गावातील व बाहेर गावातील सर्व गरजू व्यक्तींनी या शिबिराचा वेळेत हजर राहून लाभ घ्यावा असे आवाहन अमोल भैय्या राऊत व सरपंच,उपसरपंच,व सर्व सदस्य ग्रामपंचायत निमगाव केतकी यांच्याकडून करण्यात आले आहे.
Home Uncategorized श्रीराज (भैय्या) भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त होणार निमगाव केतकी येथे भव्य आरोग्य शिबिर...