जंक्शन प्रतिनिधी :गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी भंडाऱ्याची उधळण व बाळूमामाच्या नावानं चांगभलं च्या गजरामध्ये वाजत गाजत बाळूमामांच्या मेंढ्या पालखी क्रमांक- 4 संत श्री सद्गुरू बाळुमामा अध्यात्मिक तळ श्री क्षेत्र बिरंगुडी येथे दाखल झाली बाळूमामांच्या आगमनामुळे व परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे व भक्तीमय वातावरण होते गुरुवारी संध्याकाळी शंकर महाराज जाधव यांचे बाळूमामांच्या चरित्रावरील प्रवचन झाले व मठाधिपती जमीर दाऊद शेख यांच्या हस्ते यांच्या हस्ते आरती संपन्न झाली ,
काझड, बोरी, बिरंगुडीगुडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करुन भक्तीचा आनंद घेतला, संत श्री सद्गुरू बाळुमामा अध्यात्मिक तळ श्री क्षेत्र बिरगुंडी येथे बाळुमामांची पालखी विसवल्यानंतर रोज सकाळी आरती महाप्रसाद व संध्याकाळी भजन कीर्तन आरती व महाप्रसादाचा इत्यादीचे आयोजन केले जात असे बाळूमामाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भक्त मंडळी येत होते याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला दुसऱ्या दिवशी संग्रामभैय्या प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संध्याकाळची आरती संपूर्ण झाली कार्तिकी द्वादशीपर्यंत चाललेल्या सोहळ्याला दिलीप लक्ष्मण वाघमारे पोपटराव शेळके पंढरपूर, वकील विजय ओगले साहेब ,वकील पृथ्वीराज जगताप साहेब ,सांगळे साहेब धैर्यशील राजे भोसले सरकार इत्यादींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली या सर्वांच्या हस्ते बाळुमामाची आरती संपन्न झाली.विक्रम सुर्यकांत जगताप यांचे देखील संगीत प्रवचन देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्तिकी एकादशी दिवशी हजारोच्या संख्येने भाविक भक्त संत श्री सद्गगुरू बाळुमामा आध्यात्मिक तळ श्री क्षेत्र बिरंगुडी याठिकाणी बाळुमामाच्या पालखीचे व बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाले हे दृश्य पाहून कलियुगामध्ये बाळू धनगराची फोड्या माळावरती यात्रा भरेल या वाक्याची प्रचिती आली द्वादशी ची आरती महाप्रसाद घेऊन बाळुमामाची पालखी सोनारवाडी या गावाला प्रस्थान झाली बाळूमामा ना निरोप देताना त्या परिसरातील पंचक्रोशी सर्वच भाविक भावुक झाले होते. तसेच दिनांक, २६/११/२०२१ तारखेला सदगुरू संत बाळुमामा देवालय आदमापूर ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले सरकार व बग्गा नं, १ चे कारभारी यांनी बग्गा नं, ४ व सदगुरू संत बाळुमामा अध्यात्मिक तळ मौजे बिरंगुडी या ठिकाणी भेट दिली.