कुर्डूवाडी येथे रेल्वे ग्राउंड वर झालेल्या लेदर बॉल क्रिकेट मैत्रीपूर्ण सामन्यात जय हिंद “अ “संघावर जय हिंद” ब “संघाने श्रीकांत खोत यांच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला. कुर्डूवाडी मध्ये रेल्वे ग्राउंड वर झालेल्या लेदर बॉल क्रिकेट सामन्यात जय हिंद अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 163 धावा केल्या होत्या.जय हिंद “अ “संघाने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना. श्रीकांत उर्फ गोटू खोत यांनी आपल्या नावाला साजेल अशी खेळी करून 77 चेंडू मध्ये 121 धावा केल्या व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या खेळी दरम्यान श्रीकांत खोत यांनी 14 चौकार व 8 षटकार मारले. श्रीकांत खोत यांनी केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे त्यांना सामन्याचा मानकरी हे पारितोषिक अशोक पांढरे यांच्या हस्ते देण्यात आले. या दोन्ही संघांमध्ये अनेक मान्यवर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. श्रीकांत खोत यांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.