शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या माध्यमातून इंदापूर बॅडमिंटन स्पर्धा 2022 उत्साहात संपन्न. स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील संघांनी मारली बाजी. शौर्य प्रतिष्ठानच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक.

इंदापुरमध्ये प्रथमच शौर्य प्रतिष्ठान, इंदापूर च्या माध्यमातून बॅडमिंटन स्पर्धा २०२२ अयोजित केल्या होत्या. इंदापूर तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागून राहिलेल्या ही बॅडमिंटन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.सदर स्पर्धेत इंदापुर, बारामती,अकलूज, माळीनगर व विविध ठिकाणांहून स्पर्धक आले होते हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.काल दि.६ ऑगस्ट रोजी सदर स्पर्धा क्रिडा संकुल इंदापूर येते पार पडली. सदर स्पर्धेत ऐकूण १८ टिम सहभाग होत्या त्यांच्या मधील सुरवाती पासूनच सर्वोत्तम संघ खेळ पाहण्यासारखे सामने झाले. इंदापूर मधील प्रेक्षकांनीही या स्पर्धेचा मनमुरात आनंद घेतला. शौर्य प्रतिष्ठान इंदापूरने या स्पर्धेचे अगदी व्यवस्थितरीत्या व्यवस्थापन केल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली.इंदापूर बॅडमिंटन स्पर्धा 2022 स्पर्धेचे सुरवात इंदापुर मधील सुप्रसिद्ध एम.बी. बी.एस डी.ऑर्थो डाॅ.समीर मगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
त्याचबरोबर सदर स्पर्धेचे सूत्र संचालन मराठा सेवा संघ इंदापूर चे सचिव गणेश रणदिवे यांनी केले. क्रिडा संकूल चे व्यवस्थापक अशोक करे यांनी देखील सर्व स्पर्धेची व्यवस्था पाहीली. त्याचबरोबर सदर स्पर्धेची संपुर्ण जबाबदारी पंच म्हणून अगदी मोलाचे काम रोहन गुडेंकर,निखील वाघ,अभिजीत ननवरे,अभिषेक कांबळे यांनी पाहीले.शौर्य प्रतिष्ठान अयोजित इंदापुर बॅडमिंटन चॅम्पियन्स ट्राॅफी २०२२ प्रथम क्रमांक अजिंक्य शिंदे व डाॅ.सुरज महाडिक रा.अकलूज यांच्या टिम ने पटकवले तर द्वितीय क्रमांक डाॅ.अभिजीत राजेभोसले व डाॅ.समिर दोशी रा.अकलूज यांची टिम तर तृतीय क्रमांक पोपट गोफणे व सुरज वाघमोडे यांची टिम रा.माळीनगर यांना भेटले. म्हणजेच एकंदरीतच प्रथम द्वितीय आणि तृतीय हे तिन्ही क्रमांक माळशिरस तालुक्यातील या संघांनी पटकावले असे म्हणता येईल.सदर स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू हे अंतिम बक्षिस इंदापुर मधील अथर्व गुरगुडे यांनी आपला खेळ दाखवून सर्व स्पर्धकांना आश्चर्यचकित केले.सदर स्पर्धेत सर्व स्पर्धकांचा सन्मान मराठा सेवा संघ,इंदापूर विचारसरणीतून ऐतिहासिक पुस्तके देऊन केले.शौर्य प्रतिष्ठानची संपूर्ण टिम राहुल गुडेंकर,प्रतिक झोळ,विजय आवटे,प्रज्वल गायकवाड,ऋषिकेश काळे,संकेत भागवत,निखिल कारंडे,गणेश मुळीक यांनी भरपूर मेहनत घेवून सदर स्पर्धा इंदापुरमध्ये प्रथमच शहराची एक चांगली ओळख देऊन पार पाडल्या.सर्व विजेतेंना सर्व बक्षिस,रोख रक्कम रूपये,सन्मानपत्र जागेवर देऊन स्पर्धेचा निरोप समारंभ घेतला व क्रिडा संकुल इंदापूरचे अधिकारी महेश चावले साहेब यांचे आभार मानले त्याचबरोबर डाॅ.अभिजीतराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करून शौर्य प्रतिष्ठान,इंदापूर चा सन्मानपूर्वक केला व कौतुकीची थाप ठोकली.
एकंदरीतच शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन कार्यक्रम घेऊन समाजातील खेळाडू असतील किंवा इतर क्षेत्रातील स्पर्धक कलाकार असतील यांना नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष झालेले आहेत.त्यामुळे अल्पावधीतच इंदापूर तालुक्यात शौर्य प्रतिष्ठान ने आपले नावलौकिक वाढवण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here