पालघर तालुक्यातील सफाळा पश्चिमेला असलेल्या मेघराज शिक्षण संस्थेचे अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक शाळेतील सहशिक्षक वैभव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला .सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे 108 वे अधिवेशन निसर्गरम्य वाढवण येथे रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष संतोष कृष्णा पावडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले .वैभव पाटील हे गेली अनेक वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत.त्याचबरोबर कला क्रीडा,आरोग्य , सहकार, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता आधी विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे. व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते निस्वार्थपणे काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, या आधी त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेंच सामाजिक क्षेत्रातील सूर्यवंशी क्षत्रिययुवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागा कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल परिसरात कौतुक होत आहे.
Home Uncategorized शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल वैभव पाटील यांना आदर्श शिक्षक...