प्रतिनिधी: नसीर बागवान
माढा तालुक्यातील उपळवटे येथील व अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे शिकणारी पूजा शहाजी पाटील या विद्यार्थिनीने बारावी विज्ञान शाखेत ८८ टक्के मार्क मिळवले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुळगाव चिंचोलीकाटी (ता. माढा) येथील असणारे शहाजी पाटील हे मजुरीसाठी उपळवाटे येथे आहे. या ठिकाणी देवडकर यांची शेती करू लागले. वडिलांना शेतीमध्ये मदत करत पूजाने आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि दहावी मध्ये ९३ टक्के मार्क घेऊन व केंद्रात प्रथम आली. यानंतर बारावी मध्ये ‘कमवा व शिका’ मध्ये काम करून शिकत तिने चांगले मार्क घेतले आहेत. तिच्या या यशाबद्दल जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटीलएनी मानाचा फेटा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान केला.