इंदापूर: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये आत्ता शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे बावडा मंडल कृषी अधिकारी श्री. गणेश सूर्यवंशी यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. इंदापूर तालुक्यासाठी प्रामुख्याने कांदा, सोयाबीन, तूर ,बाजरी याच पिकांसाठी शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मध्ये विमा काढता येणार आहे. पुढे बोलताना त्यांनी विमा संरक्षणाच्या बाबी सांगितल्या त्या पुढील प्रमाणे आहेत १) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान २) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान ३) पीक पेरणी पासून काढणीपर्यंत कालावधीत उत्पन्नात येणारी घट ४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ५) नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान इत्यादी विमा संरक्षणाच्या बाबी आहेत. आणि हा पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१|७|२०२३ असून अंतिम तारखेच्या आत मध्येच सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरून घ्यावा असे त्यांनी सांगितले. बावडा कृषी मंडलचे कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक अतुल जावळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन, त्यांना नेमून दिलेल्या प्रत्येक गावात जाऊन, या पिक विमा विषयी, शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजनेविषयी ,पी ,एम किसान या योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. यांच्याप्रमाणेच इंदापूर तालुक्यातील सर्वच कृषी विभागातील कृषी सहाय्यक आपापल्या परीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना सांगत आहेत. पिक विमा साठी आवश्यक असणारी कागदपत्रे १) पीक नोंद असलेला सातबारा उतारा २) आधार कार्ड झेरॉक्स ३) बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स ४ ) स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे व एक रुपया यामध्ये आपल्या पिकाचा विमा तुम्ही काढू शकता. पिक विमा अर्ज नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सुविधा महा-ई-सेवा केंद्र, नजीकच्या राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खाजगी बँक यांच्या शाखा ,किंवा कृषी विभागाला तुम्ही संपर्क करू शकता.मग वाट कसली पाहताय शेतकरी राजांनो, आजच आपला पिक विमा एक रुपयांमध्ये काढून घ्या असे आवाहन कृषी विभागामार्फत केले जात आहे.
Home Uncategorized “शेतकऱ्यांनो प्रधानमंत्री पीक विमा करून घ्या तोही फक्त १ रुपयात”: कृषी अधिकारी...