मुंबई : शेतकऱ्यांकडील कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवले जाणार आहे. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिर्धीची मागणी होती. राज्याच्या अनेक भागांत लाखो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना बिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरत्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यात कृषी पंपांची ४६ हजार कोटींची थकबाकी आहे. ४४ लाख ०७० हजार कृषी पंप वीज कनेक्शन असून, त्यापैकी जवळपास ४० लाख वीज कनेक्शन असे आहेत ज्यांच्याकडे थकबाकी आहे. फडणवीस यांच्या घोषणेनंतर महावितरण एक-दोन दिवसांत स्थगितीचे लेखी आदेश काढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाच दिलासा देण्यात आला आहे की, संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना हे त्यातून स्पष्ट होणार आहे.
Home Uncategorized शेतकऱ्यांना दिलासा: वीज तोडणी मोहिमेस स्थगिती,२ दिवसात लेखी आदेश निघण्याची शक्यता.