इंदापूर:दिनांक 22 जुलै रोजी विशाल शिंदे हा शेटफळ हवेली मधील राहणारा युवक असून आपली चार चाकी बोलेरो गाडी घेऊन कामानिमित्त पिटकेश्वर या ठिकाणी गेला होता. विशाल आणि त्याचे मित्र पिटकेश्वर मधील काम संपल्यानंतर काटी ते कचरेवस्ती या मार्गातून शेटफळ हवेलीला निघाला होता त्याच्याबरोबर त्याचे मित्र ऋषिकेश गायकवाड व कांतीलाल आरडे हे देखील होते.घरी लवकर जायचे होते कारण त्या दिवशी विशाल शिंदे चा वाढदिवस होता. आणि कुटुंबातील सदस्य केक कापण्यासाठी त्याची वाट पाहत होती.
घराकडे मार्गस्थ होताना वेळ रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी काटी ते कचरेवस्ती या रस्त्यावर निर्जन ठिकाणी या युवकांना स्पेंडर गाडी रस्त्याच्या बाजूला दिसली. गाडी निर्जन ठिकाणी उभी का केली असावी?याचा प्रश्न या युवकांना पडला. त्यांनी ते चालवत असलेले चार चाकी गाडी सावकाश घेतली. गाडीपासून काही अंतरावरच एक महिला छोट्या बाळासह व महिलेचे पती हे अडचणीत असून त्यांना तीन माणसे कोयत्याचा धाक दाखवत लुटत असलेले लक्षात आले. त्या कोयताधारी लोकांनी तोंडाला कापड बांधलेले होते व ते महिलेला लुटत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली व शेटफळ हवेलीतील हे तिघे युवक त्या अडचणीत असलेल्या लोकांची सोडवणूक करण्यासाठी पळत तिथे गेले.
या चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवत “जवळ आला तर मारून टाकीन” असा दम दिला. तरीही या युवकांनी तेथून हटण्यास मनाई केली.”बाळाला व त्यांच्या आई-वडिलांना सोडून द्या तोपर्यंत आम्ही जाणार नाही”असे प्रत्युत्तर त्या चोरांना या युवकांनी दिले.त्यानंतर मात्र हे चोर तेथून पळून गेले. चोर पळून गेल्यानंतर त्या महिलेने “माझ्या गळ्यातील मंगळसूत्र व पैसे या चोरानी पळवले आहेत त्यांना पकडा” अशी विनवणी केली. त्यानंतर मात्र या युवकांनी धाडसाने पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत-करत वरकुटे रोडवर हेगडे वस्ती ते यादव वस्तीच्या दरम्यान पोहचले व तेथून चोरांनी चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी युनिकॉर्न गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेले.दरम्यान गाडीचा पाठलाग करताना विशाल शिंदे यांनी इंदापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांना मोबाईल वरून संपर्क करत ही सर्व हकीकत सांगितली व चोरांनी येथे गाडी टाकून पळ काढला आहेे अशी कल्पना दिली व त्या ठिकाणचे लोकेशनही पाठवले. अवघ्या पंधरा मिनिटात इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर साहेब व त्यांची सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.चोर जी गाडी सोडून पळून गेले होते ती गाडी क्रमांक Mh42/Ay/2745 दुचाकी युनिकॉर्न गाडीची माहिती काढली असता दोन दिवसांपूर्वीच ही गाडी चोरीला गेली होती. पोलिसांनी गाडीच्या मालकास फोन करून गाडी विषयी माहिती दिली.
त्यानंतर ही सर्व टीम ज्या ठिकाणी लुटमार झाली होती त्या ठिकाणी म्हणजेच काटी ते कचरेवस्ती रस्त्याला गेले असता ती महिला व पुरुष हे तेथे आढळून आले नसून भीतीपोटी ते निघून गेल्याचे लक्षात आले. घरी असलेला वाढदिवसाचा कार्यक्रम सोडून विशाल शिंदे याने दाखवलेल्या धाडसामुळे लहान बाळासह पती-पत्नीचा जीव वाचला व नुकतीच चोरी गेलेली शाईन गाडी दोन दिवसात मिळूनही गेली. विशाल शिंदे व त्याच्या मित्रांनी दाखवलेल्या या धाडसाचे इंदापूर पोलीस स्टेशन मार्फत कौतुक करण्यात आले. “हा माझ्या वाढदिवसाचा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.” असे विशाल शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. संकटात असलेल्या लोकांना आपण नेहमी सहकार्याची भूमिका ठेवायची व मदत करायची असे आवाहन ही विशाल शिंदे यांनी यावेळी केले.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील युवकाचा फिल्मी स्टाईल थरार, प्रवाशी लुटणाऱ्या टोळीचा पाठलाग… इंदापूर पोलिसांचीही...