शेटफळ हवेलीचे संतोष बनकर यांच्या मातोश्री सुनंदा बनकर यांचं निधन.

👉 इंदापूर तालुका प्रतिनिधी: -सचिन शिंदे
इंदापूर: शेटफळ हवेली येथील संतोष बनकर यांच्या मातोश्री सुनंदा धनाजी बनकर यांचे दिर्घ आजाराने रविवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर २२ जानेवारी २०२३ रविवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदा बनकर यांचा स्वभाव खूप कष्टाळू आणि मनमिळाऊ होता, त्या खूप जिद्दी होत्या. त्यांनी कधीच कोणत्या गोष्टींमध्ये हार मानली नाही परंतु पाठीमागील काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते.
या काळामध्ये त्यांचा मुलगा संतोष बनकर यांनी आपल्या आईची खूप जिवापाड सेवा केली ते विविध ठिकाणी आपल्या आईला उपचारासाठी 6 वषेॅ दवाखान्यात घेऊन जात होते. परंतु त्यांना यामध्ये यश आले नाही, आणि अखेर रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला इंदापूर तालुक्यातुन मोठा सामुदायिक उपस्थित होता ता.अध्यक्ष हनुमंत कोकाटे,जय भवानी विकासगड अध्यक्ष श्रीमंत ढोले सर,झगडेवाडी ग्रामपंचायत सरपंच अतुल भाऊ झगडे ,लातुरचे बीडीओ म्हेञे साहेब,इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे, जलसंपदा विभाग इंदापूर सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत शेटफळ हवेली सरपंच व उपसरपंच, सदस्य,निमगाव केतकी ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान इंदापूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बनकर परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here