कुर्डूवाडी प्रतिनिधी-(नसीर बागवान ): शेंद्री येथे झालेल्या शेंद्री प्रीमियर लीग या टूर्नामेंट मध्ये बालाजी टायगर्स या संघाचा पराभव करून राज भोसरी या संघाने विजेतेपद पटकावले. राज भोसरे क्रिकेट क्लब हा ग्रामीण भागातील संघ असून देखील शहरी भागातून खेळला व या संघाने कुर्डूवाडी येथील बलाढ्य संघ मावळा व पंजाब तालीम कुर्डूवाडी या संघाचा पराभव करत सेमी फायनल मध्ये रिधोरे संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. व अंतिम फेरी मध्ये बालाजी टायगर वेताळवाडी या संघाचा पराभव केला. व बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील राष्ट्रवादीच्या शेंद्री प्रीमियर लीगचे मानकरी झाले अंतिम सामन्यांमध्ये राज भोसरे या संघाचा कर्णधार संजय चव्हाण यांनी धारदार गोलंदाजीवर चार बळी मिळवले व फक्त आठ धावा दिल्या. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज सुनील काळे, व बेस्ट बॅट्समन रोहित बागल यांना देण्यात आले हे सर्व पारितोषक बाळासाहेब काकडे युवा उद्योजक पुणे व महेश कल्याण चव्हाण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी यांच्या हस्ते देण्यात आले. राज भोसरे हा संघ ग्रामीण भागातून असून हा संघ उभा करण्यात संजय चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे, गेली दहा ते पंधरा वर्षे या संघाचा कुर्डूवाडी व आसपासच्या तालुक्यात आपल्या खेळाने वर्चस्व सिद्ध केले आहे .