मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उध्दव ठाकरे यांच्या विरोधातील बंडानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी पहावयास मिळत आहेत.महाराष्ट्रातील तब्बल 50 आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यास शिंदे गटाची टीम यशस्वी झाली आणि त्या नंतर महाराष्ट्रातील शिवसेनेतही पद निवडीत बदल झाले त्यापैकी एक बदल म्हणजे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून केदार दिघे यांची निवड.याच केदार दिघे यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.कारण एका महिलेनं त्यांच्याविरोधात धमकावल्याचा गुन्हा दाखल केलाय. सेंट रेजीस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आलीय. त्यात रोहित कपूर या बड्या व्यावसायिकानं हा अत्याचार केल्याचा आरोप पीडित युवतीनं केलाय. तर पैसे घे आणि याची वाच्यता कुठे करु नकोस, नाहीतर सुला संपवू अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याचं या तक्रारीत संबंधित युवतीने म्हटलंय. 1 ऑगस्ट 2022 रोजीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलंय. त्यात रोहित कपूर आणि केदार दिघे हे दोघे दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे त्याच दिवशी या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्न आता विचारला जातोय. पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत आहेत.महिलेचा नेमका आरोप काय?
बलात्कार पीडित महिलेनं धमकावल्याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित कपूर याने 28 जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पीडित तरुणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिधे यांनी तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी दिघे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) तर रोहित कपूरविरोधात कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Home Uncategorized शिवसेनेचे निवनिर्वाचीत ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यावर पीडित महिलेला धमकवल्या प्रकरणी गुन्हा...