शिवसेनेकडून संदेश मोरे याचा सन्मान.

निमसाखर येथील संदेश जयंतराव मोरे यांची MPSC मधून सहाय्यक मोटार निरीक्षक RTO मध्ये निवड झाली. त्यानिमित्त शिवसेना पदाधिकऱ्यांनी संदेश जयंतराव मोरे यांची भेट घेऊन अभिनंदन व सन्मान केला.
यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, पंचायत समिती उपविभाग प्रमुख तुषार दळवी, शैलेश पवार, जयंतराव मोरे, सागर रणवरे, निमसाखर उपशाखाप्रमुख आकाश वाघ, प्रवीण रणवरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश मोरे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे व त्यासाठी वडील निमसाखरचे प्रगतशील शेतकरी व निमसाखर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक जयंतराव मोरे, मेहुणे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रणवरे यांच्यासह शिक्षक, व मित्र परिवाराने पाठबळ दिले असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here