दौंड: शनिवार दिनांक 4 डिसेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख.सचिन भाऊ अहिर हे पुणे जिल्हा दौऱ्यावर आले असता दौंड येथे दौंड तालूका डॉक्टर सेलच्या वतीने डॉ. प्रमोद रंधीवे यांनी तालुक्यातील बायोमेडिकल वेस्टेजचा प्रश्न कायमचा मिटने संबंधित निवेदन देण्यात आले. राजवर्धन बायोमेडिकल वेस्ट प्रा लिमिटेड याच्या माध्यमातून जैविक कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात व MPCB NOC मिळणे बाबत दौंड तालुका डॉक्टर सेल वतीने डॉक्टर प्रमोद रंधीवे यांनी निवेदन दिले.यावेळी डॉ म्हणाले,बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट मुळे जैविक कचर्याची विल्हेवाट व्यवस्थित होणार आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि रोगराई पसरणार नाही. निवेदन स्वीकारल्यानंतर शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हासंपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असे बोलत सकारात्मक प्रतिसाद दिला. व हा प्रश्न सोडवण्यासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.निवेदन देताना दौंड तालुका शिवसेना डॉक्टर सेल प्रमुख डॉ. प्रमोद रंधवे ,डॉ. वैभव सातव ,डॉ. प्रकाश भोसले व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव सरोदे उपस्थित होते.