आता इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच शिवदीप नर्सिंग होम च्या माध्यमातून टेस्ट ट्यूब बेबी या केंद्राची सुरुवात होणार आहे.सदर केंद्र शिवदीप नर्सिंग होम, जुना कचोरी रोड, बारामती बँकेजवळ इंदापूर येथे सुरू होणार असून या केंद्राचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सध्या इंदापूर मध्ये राजकीय वातावरण तापले असून या तापलेल्या वातावरणानंतर आजी-माजी मंत्री एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अपत्य नसणाऱ्या निराश पालकांवर उपचार करण्यासाठी देशभरातील अनेक शहरांत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाले आहेत आणि इंदापुरातील लोकांना या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या मोठ्या शहरात जावे लागत होते परंतु आता इंदापूर शहरातच IVF ही सुविधा झाल्याने इंदापुरकरांना नक्कीच याचा फायदा होईल.इंदापुर मध्ये नव्याने सुरू होत असलेले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर (आय.व्ही.एफ.) इंदापूर तालुक्यातील पहिले आणि एकमेव होणार असून याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आधुनिक उपचार, तंत्रज्ञानयुक्त पद्धतीने होणार आहे.
सदर केंद्र शिवदीप नर्सिंग होम, जुना कचोरी रोड, बारामती बँकेजवळ इंदापूर येथे सुरू होणार असून आपत्य नसलेल्या निराश पालकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या उद्देशाने केंद्राची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती डॉ.शिवाजीराव खबाले व डॉ.दिपाली खबाले यांनी दिली आहे.
सदर टेस्ट बेबी सेंटर मधील तज्ज्ञ डॉक्टर अपत्य नसलेल्या पालका वरती आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीने उपचार करणार आहे, अशी माहिती डॉ.दिपाली खबाले यांनी दिली आहे.त्या पुढे म्हणाल्या की कमी खर्चात उपचार करून जागतिक पातळीवरील उपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ खबाले यांनी दिली.👉 आय व्ही एफ प्रक्रिया:- आय व्ही एफ प्रक्रियेत वीर्यावर एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते.(सीमेन प्रोसेसिंग) यामुळे त्यातील पुढे जाण्याची चांगली क्षमता असलेले व नॉर्मल शुक्राणू वेगळे केले जातात. नंतर बाहेर काढलेली स्त्रीबीजे व शुक्राणू (विशिष्ट प्रमाणात) एकत्रित ‘इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. यामुळे शुक्राणू स्त्रीबीज फलित करते. १६-१८ तासांनंतर किती स्त्रीबीजे फलित झाली, हे पाहिले जाते. अपेक्षित फलित झालेली स्त्रीबीजे वेगळी करून त्यांपासून गर्भ कसे निर्माण होतात, हे बघितले जाते. तयार झालेल्या गर्भांपैकी काही गर्भाशयाच्या पिशवीत सोडले जातात. थोडक्यात आय.व्ही.एफ.साठी शुक्राणूंची संख्या, गती आणि रचना योग्य त्या प्रमाणात नॉर्मल पाहिजे.