शिक्षक समितीने दिलेली जबाबदारी पार पाडणार – जयश्री प्रविण धाईंजे.

👉 शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षक पतसंस्थेची भरभराट – ज्ञानदेव बागल.
👉 शिक्षक समितीचे शिक्षक विकास पॕनल हॕट्रीक करणार – शिक्षक नेते हरिश काळेल.
इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक २०२२ – २०२७ च्या निमित्ताने शिक्षक समितीच्या शिक्षक विकास पॕनलची निमगाव केतकी – लासुर्णे गटाची सहविचार सभा संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे शिक्षक समितीचे ज्ञानदेव बागल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी या निवडणूकीत शिक्षक विकास पॕनल मधून अ जाती व जमाती या प्रवर्गातून श्रीमती जयश्री प्रविण धाईंजे यांची उमेदवारी जाहिर झाल्याबद्दल महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग ,सुरेखा अभंग, प्रतिभा जौंजाळ , मंजुषा धारूरकर ,संध्या जाधव, गीतांजली जाधव ,गीतांजली लाड , सुवर्णा क्षिरसागर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी शिक्षक नेते सुनिल वाघ यांनी प्रास्तविक करून निवडणूक काळातील नियोजन सांगितले , यावेळी शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट ) अध्यक्ष अनिल रूपनवर ,माजी चेअरमन किरण म्हेञे , संतोष हेगडे , बापूराव जाधव, प्रताप शिरसट ,भारत ननवरे , तुकाराम ठोंबरे , सावता भोंग , सुरेखा अभंग ,प्रतिभा जौंजाळ यांनी विचार व्यक्त केले. निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक उमेदवारांची नावे घेण्यात आली.सहविचार सभेसाठी शिक्षक सोसा चेअरमन वसंत फलफले , नितिन वाघमोडे , सुनिल शिंदे , उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , लतिफ तांबोळी , संजय भोंग ,चंद्रकांत ठोंबरे , उपस्थित होते.निमगाव केतकी लासुर्णे गटातील शिक्षक सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.सहविचार सभेचे सुञसंचालन दत्ताञय लकडे यांनी केले.आभार अजिनाथ आदलिंग यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here