शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून समाजातील गरजूंकरता वेगवेगळी शिबिरे राबवण्यास कटिबद्ध- महारुद्र पाटील. निमगाव केतकी येथील शिबिरात 357 नागरिकांनी घेतला लाभ.

आज निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सर्व बालक, युवा, पुरुष, स्त्री नवविवाहित स्त्री, गर्भवती महिला व वृद्धांची मोफत तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख महारुद्र पाटील, बबन खराडे,राजकुमार जठार यांच्या हस्ते सरस्वती देवीचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे चे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याकरिता आम्ही तत्पर राहू. त्याचप्रमाणे शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून यापुढेही अशीच शिबिरे राबवू आणि याचाच एक भाग म्हणून बारा फेब्रुवारी रोजी इंदापूर मध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरासही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही महारुद्र पाटील यांनी केले. आज निमगाव केतकी तील झालेल्या  या शिबिरात वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या यात तब्बल 357 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
तसेच निमगाव केतकी येथील केतकेश्वर विद्यालयांमध्ये जाऊन डॉ.आरकिले व डॉ.शेख मॅडम यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी योग्य असे मार्गदर्शन केले.
हे महाआरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सुचिता गवळी, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. कैलास व्यवहारे, डॉ. अरविंद आरकिले, अभिजीत पैठणकर, अभिजीत गायकवाड, सतीश पानसरे, सुषमा बागुल, चंद्रकला पवार, नंदा चौधरी, प्रिया पाडवी, रोहन जाधव ,सत्यशीला गायकवाड, मनीषा अडसूळ, शितल राऊत, सारिका कोकणे, डॉक्टर अलिशा शेख, डॉ. गौरी , रुग्णवाहिका चालक जालिंदर आदलिंग,इमाम मुलांनी, आप्पा राऊत, गौरी जगताप, अनिता ननवरे ,धनराज मिसाळ, धीरज मिसाळ, संतोष कांबळे, भारत भले, महेश भुजबळ, दादा कोकरे, चंद्रशेखर गणगे, राजकुमार काळे, अभिजीत पवार यांनी परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वीरिते पार पाडले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here