महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक समितीच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांचा विशेष सत्कार.
इंदापूर: दि ८ रोजी प्राथमिक शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांचेसाठी काम करणाऱ्या इंदापूर तालुका शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील सर्व महिला शिक्षकांचा शाळेवर जावून डायरी , पेन , गुलाब पुष्प देवून विशेष सन्मान करण्यात आला.शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी सांगितले शिक्षक समितीच्या वतीने दरवर्षी महिला दिनाचे दिवशी महिला शिक्षिकांचा सन्मान केला जातो. गेल्यावर्षी कोरोना काळात अध्यापन खंड न पडू देता आॕनलाईन शिक्षणासाठी व्हिडिओ व साहित्य निर्मिती करणाऱ्या ७० महिला व पुरुष शिक्षकांना कोविड योद्धा पुरस्कार देवून सन्मानीत केले होते. तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून शिक्षक समितीचे पदाधिकारी यांनी शाळेवर जावून महिला शिक्षकांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.सत्कारासाठी शिक्षक सोसा चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन सुनिल वाघ , किरण म्हेञे , नितिन वाघमोडे , सुनिल शिंदे , संतोष हेगडे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे , सरचिटचिणीस विनय मखरे , लतिफ तांबोळी , प्रमोदकुमार कुदळे , शांताराम रणवरे , बापूराव जाधव , प्रदिप रणमोडे , महेश कणसे , चंद्रकांत भिसे , प्रताप शिरसट , नाना पवार , विजय ठोंबरे , प्रविण ढुके , रविंद्र तनपुरे , अमोल बोराटे , अरुण मस्तुद , दत्ताञय लकडे , अजिनाथ आदलिंग , भारत गायकवाड , प्रकाश वाघ यांनी सहकार्य केले.