इंदापूर प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शाळा-महाविद्यालयीन 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ कोरोनाचे संकट मोठे व गंभीर असल्याने या संकटाचा सामना करण्यासाठी लसीकरणाला अत्यंत महत्त्व आहे.लहान मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी या लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करून घ्यावे.’