इंदापूर तालुक्याचे सुपुत्र असणारे वैभव गोफणे ( मुळगाव वडापुरी) यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून मुठा नदीपत्रात बुडणाऱ्या अख्ख्या कुटुंबाला वाचवले, त्यामुळे सर्व स्तरातून वैभव गोफणेचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले जात आहे .वैभव हे डेक्कन पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत आहेत.गेल्या चार दिवसापूर्वी पुण्यात भरपूर पाऊस पडला होता.मुठा नदीपात्रात कार सह एक कुटुंब वाहत चालले असताना त्यांना डेक्कन पोलीस व अग्निशामक दल यांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर वाहत्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले ,आणि याच डेक्कन पोलीस टीम मध्ये आपले इंदापूर तालुक्याचे वडापुरी या गावचे वैभव गोफणे हे देखील त्या कुटुंबासाठी देवदूत होऊन मदतीला धावून आले होते. वैभव यांनी जीवाची बाजी लावत त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. यामध्ये दोन लहान चिमुकल्यांचाही समावेश होता. मागील चार दिवसांपूर्वी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा थरार घडला आहे. या धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या सर्व टीमचा सत्कार केला आहे .डेक्कन पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक किरण पावसे, पोलीस वैभव गोफणे ,शिपाई कौटकर, गोरे, स्थानिक नागरिक चेतन पवार ,तसेच अग्निशामक दलातील जवान ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस संदीप कारले, या सर्वांनी वाहत्या पाण्यात उतरून दोरीच्या साह्याने त्या कुटुंबाला जीवनदान दिले. या खाकी वर्दीतील वैभवच्या धाडसी कामगिरीमुळे त्या कुटुंबासाठी वैभव गोफणे हे देवदूतच होऊन आले असेच म्हणावे लागेल.जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून ही वैभव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अग्निशामक दलातील जवानांना त्यांच्या या धाडसी कार्याला सलाम.
Home Uncategorized शाब्बास: वडापुरीचे खाकी वर्दीतील सुपुत्र वैभव गोफणे बनले देवदूत ,मुठा नदीपात्रात बुडणाऱ्या...