शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरला,बारामती तालुक्यातील अजब घटना.

बारामती: जणू काही चोरट्यांना बैलगाडी शर्यतीच्या निर्णयाची कुणकुणच लागली होती. म्हणूनच शर्यतीचा बैल विकत दिला नाही तर त्यांनी चोरलाच असाच प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे.
ही घटना न्यायालयाने बैलगाडी शर्यंतीला परवानगी देण्याच्या अगोदरची असली तरी आता या निर्णयानंतर अधिक चर्चेत आहे. खिलार बैलांना गेल्या दोन दिवसांपासून जास्त महत्व आले आहे. पण बैलाची मागणी करुनही मालकाने बैल दिला नाही म्हणून चोरट्यांनी थेट दावणीचा सोडून नेला. याप्रकरणी अखेर पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खिलार बैल मालकाच्या स्वाधिन करण्यात आला.
नेमका काय घडला प्रकार :
मुळचे आष्टी तालुक्यातील (जि. बीड) असलेले ऊसतोड मजूर रमेश रामा करगळ हे ऊसतोडणीसाठी कुटूंबीयांसोबत जनावरांनाही घेऊन बारामती गेले होते. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यातील मानाजीगनर येथे ऊसतोडणी करीत होते. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे असलेल्या खिलार बैल विकायचा का? अशी अनोळखी इसमांनी विचारणा झाली होती. मात्र, लहानपनापसून सांभाळ केलेल्या बैलाची विक्री करायची नाही असे त्यांनी सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी रमेशराव हे ऊसतोडणीसाठी फडावर गेले असता त्यांच्या बैलाची चोरी झाली. झोपडीसमोर बांधलेला खिलार जातीचा खोंडच चोरट्यांनी सोडून नेले. रमेशराव व त्यांच्या कुटूंबीयांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र, खोडाचा काही पत्ता लागला नाही.
“माझं खोंड दिसलं का हो ?”
रमेश करगळ यांनी खिलार खोंडाला लहानाचे मोठे केले होते. शिवाय ऊसतोडणीला जातानाही तो बरोबरच असायचा. ऊसतोडणीला गेल्यावर झोपडीसमोर बांधलेल्या बैल चोरट्यांनी घेऊन गेले. मात्र, कामावरुन परतल्यावर पाहिले तर दावणीला बैलच नाही. सैरावैरा होत त्यांनी शोधाशोध सुरु केला पण त्या नवख्या भागाची त्यांनी जास्त माहितीही नव्हती. दिसेल त्याला माझं खोंड दिसलं का एवढंच विचारत होते. मात्र, हताश होऊन ते घराकडे परतले.
फिर्याद नोंदवावी तरी कशी?
बैलाची चोरी झाल्याची फिर्याद नोंदवावी तर आपला भाग नाही. काही अडचण निर्माण होईल म्हणून त्यांनी तक्रार न नोंदवता शोधकार्यच कायम ठेवले. पण एका स्थानिकाने त्यांना फिर्याद नोंदवण्य़ास मदत केली. चौकशीअंती मानाजीनगर गावात चाकण भागातील काही लोक खिलार खोंड खरेदीसाठी येऊन गेल्याची माहीती पोलीसांना मिळाली. सखोल चौकशी केल्यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तिघांना ताब्यात घेऊन रमेश करगळ यांना त्यांचा खिलार खोंड परत केले आहे. तिन्हीही आरोपी हे खेड तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here