वेळेचे बंधन, धैर्य आणि शिस्त खेळामुळेच शक्य – पं.स. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट

कळंब: वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब अंतर्गत सन 2022-23 क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मिथापल्ली यांची होती .
यावेळी गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून खेळाचे महत्व पटवून दिले.आपल्या मनोगतामध्ये गटविकास अधिकारी परीट म्हणाले की, खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण हे वेळेचे बंधन, धैर्य,शिस्त,गटामध्ये काम करणे हे शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो. खेळ खेळल्यामुळे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यात मदत मिळते. जसे की संधिवात, लठ्ठपणा, हृदयविकार,मधुमेह इत्यादी. हे जीवनात धैर्य शिस्तबद्धता, वेळेचे पालन करणे आणि सभ्य बनवते. खेळामुळे बौद्धिक क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते आणि याचा परिणाम अभ्यासावर मन लागून चांगले गुण मिळतात असे गटविकास अधिकारी म्हणाले.यावेळी प्रमुख पाहुणे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी मितापल्ली म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खेळामध्ये आपले नाव लौकिक करून गावाचे राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव उंचवावे. आपल्या पालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून अभ्यासतही लक्ष द्यावे असा सल्लाही पोलीस अधिकारी नेतापल्ली यांनी दिला.यावेळी भोसरी येथे झालेल्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेत १७ व १९ वयोवर्ष गटातील मुलांनी विजय प्राप्त करून राज्यपातळीवर आपले स्थान निश्चित केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा गटविकास अधिकारी परिट साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम, उपाध्यक्ष श्री मधुकर (बापु) पाटील ,कळंब गावच्या सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.तर प्राचार्य श्री बी.के.सर्वगोड सर, पर्यवेक्षक श्री राजेंद्र माळवदकर सर, ज्यूनिअर विभागाचे प्रमुख श्री सचिन सावंत सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here