इंदापूर: विरोधकांनी गेल्या 9 वर्षात एकही संस्था काढली नाही किंवा तसा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे विरोधकांनी अगोदर संस्था काढाव्यात, मगच बोलावे, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे प्रवक्ते ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी विरोधकांना दिले.
कचरवाडी (नि.) येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सहकारी संस्थांवर टीका केली होती. त्या संदर्भात बोलताना ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी छत्रपती कारखान्यावरही विरोधकांनी बोलावे, असा सल्ला दिला.भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी आम्ही बांधील आहोत. राज्यात हर्षवर्धन पाटील सत्तेवर असतानाच्या 20 वर्षाच्या काळात इंदापूर तालुक्याचा सर्वच क्षेत्राचा म्हणजे सहकार, शेतीसाठी पाणी, लोणी देवकर एमआयडीसी, वीज उपकेंद्रे, नद्यांवरील असंख्य बंधारे, गावोगावचे रस्ते, शिक्षण, प्रशासकीय इमारती, ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आदीच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध क्षेत्राचा सर्वांगीण असा विकास झाला आहे. त्यामुळेच आज इंदापूर तालुक्याची झालेली प्रगती दिसत आहे. या प्रगतीचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना आहे. या उलट विरोधकांनी गेल्या 9 वर्षात शिकलेल्या युवकांना नोकरी देण्यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील युवकांच्या हाताला कोण काम देणार? असा सवाल उपस्थित करीत, सध्याचा विरोधकांचा विकास हा नुसता आकड्यांचा फुगा आहे, असा टोलाही बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी लगावला.
Home Uncategorized विरोधकांनी संस्था काढाव्यात, मगच बोलावे – बाबा महाराज खारतोडे यांचा हनुमंत कोकाटे...