स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य मतदारातील उमेदवारांना संधी,स्वाभिमानी मतदार परिवर्तन करणारच- महारुद्र पाटील

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचा मतदार व सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिलेला नाही ते सारखे गद्दारी करू नका अशा शब्दात कार्यकर्त्यांना दम देत आहेत, असे असले तरी इंदापूर तालुक्यातील मतदारांचे ठरले असून यंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत परिवर्तन होणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख महारुद्र पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले मतदानापूर्वीच हे स्वाभिमानी मतदारांना गद्दार म्हणत असतील तर हे इंदापूर चे दुर्भाग्य आहे, ते स्वतः सत्ताधारी आहेत तरीही सोबतच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही हे इंदापूर तालुक्यातील मतदारांचे दुर्भाग्य आहे,स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य मतदारातील उमेदवारांना संधी देऊन पंचवार्षिक निवडणूक लढवत आहे,ज्येष्ठ नेते अशोक घोगरे,प्रचार प्रमुख शशिकांत तरंगे, शिवाजी इजगुडे व सर्व उमेदवार यांनी प्रचार यंत्रणा राबवत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, त्यामुळे मतदारांचा मिळणारा भरघोष पाठिंबा लक्षात घेता सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यामुळेच त्यांचा सोबतच्या कार्यकर्त्यांवर ही विश्वास राहिला नाही.
इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी मतदार हा शनिवारी 28 एप्रिल रोजी विमान या चिन्हावर शिक्का मारून तालुक्यातील हुकूमशाही कायमची मोडीत काढणार आहे. जर आम्ही स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल या निवडणुकीत उतरले नसते तर आज ही हुकूमशाही माणसं गावोगाव मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले नसते याची नोंद सर्व मतदारांनी घेऊन एक संधी द्यावी अशी विनंती यावेळी पाटील यांनी मतदारांना केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here