सफाळा रेल्वेच्या पश्चिमेला अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक शाळेत लायन्स क्लब ऑफ सफाळे व लायन्स क्लब ऑफ बॉम्बे मालाड मारवे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि. 8 डिसेंबर रोजी शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.याच वेळी अभिनव विद्यालयात विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शनयांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दामोदर पाटील हे होते.यावेळी प्रमुख अतिथी लायन चंदरशेखर घाग पीएमसी यांनी प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच शुद्ध पेजल योजना उद्देश स्पष्ट केला. यावेळी लायन मनोज बाबुर, लायन तासनिम हरियनवाला, लायन विकास पटोले, लायन रवी निगम, लायन विकास वर्तक, लायन अशोक सावलानी व अर्नाडे फाउंडेशनचे राजेश नायक व लायन्स क्लबचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.सदर प्रसंगी मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत यांनी शुद्धपाणी पिण्याचे फायदे विद्यार्थ्यांसमोर कथन केले.व लायन्स क्लबला धन्यवाद दिले.यावेळी कार्यकारणी सदस्य माधवराव पाटील, चंद्रकांत किणी , शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा किणी , शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील व आभार प्रदर्शन वैभव पाटील यांनी केले.