विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेने जोपासले सामाजिक दायित्व. मयत कर्जदाराच्या वारसास दिला अपघाती विम्याचा धनादेश.

नातेपुते:विद्यानंद को ऑप बँक लि.सोलापूर नेहमीच सहकारासोबत सामाजिक कार्याची जोड देऊन समाजातील विविध घटकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी सदैव तत्पर असते. त्याच पद्धतीने विद्यानंद को ऑप बँक लि.सोलापूर शाखा नातेपूते च्या वतीने मयत कर्जदार सभासदाच्या वारसाला अपघाती विमा धनादेशाचे वितरण दि.19 जुलै रोजी शाखा कार्यालय नातेपुते येथे मा. संचालक श्री. परमेष्टी गांधी यांच्या हस्ते देऊन सामाजिक दायित्व जपले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य समजली जाणारी विद्यानंद को ऑप बँक लि सोलापूर शाखा नातेपुते ही शाखा सुमारे 22 वर्षापेक्षा जास्त दिवस कार्यरत असून अनेक छोट्या- मोठ्या उद्योगांना कर्जपुरवठा करून सक्षम करण्याचा उद्देश या बँकेचा आहे.नातेपुते येथील खाजगी टमटमच्या भाड्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्याऱ्या उमेश महादेव मदने यांना जागा खरेदीसाठी पैशांची गरज भासल्याने त्यांनी बँकेत अर्ज करून जागेसाठी कर्ज स्वरूपात रु. ८,००,०००/- पैसे उपलब्धही केले. वेळोवेळी हप्ते बँकेत समक्ष जाऊन प्रमाणे भरले. 3 मुली व 1 मुलगा असा सुखी संसार चालू असताना दुर्दैवाने त्यांचा शिरवळ येथे अपघाती मृत्यू झाला.मयत कर्जदार कै.उमेश महादेव मदने आणि विद्यानंद सहकारी बँक यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने मृत्यूची बातमी शाखाव्यवस्थापक श्री.उमेश ज्ञानेश्वर कुचेकर यांना समजल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यालय सोलापूर येथील मार्गदर्शक तथा संचालक संजय शरदचंद्र गांधी , चेअरमन सुधीर शरदचंद्र गांधी व सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांना सदरील माहिती कळविली.श्री.कुचेकर व बँकेतील स्टाफ सांत्वनासाठी गेल्यानंतर मदने यांच्या कुटुंबाला कै.उमेश मदने यांचा आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीचा अपघाती विमा असल्याची माहिती दिली.अस म्हणतात ना ‘बुडत्याला काडीचा आधार ‘ त्याप्रमाणे सुमारे 10 लाखाचा विमा कवच मदने कुटुंबाला मिळाला.आज तो विम्याचा धनादेश बँकेचे संचालक मा.श्री.परमेष्टी गांधी यांनी त्यांच्या कुटुंबाकडे सादर केला.विद्यानंद को ऑप बँक व आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीच्या या कार्यतत्परतेचे सर्व समाज माध्यमातून कौतुक होत आहे. विद्यानंद को ऑप बँके प्रमाणेच इतरही बँकांनी अशा पद्धतीचे अपघाती कवच योजना राबवल्यास कर्जदाराच्या परिवारास याचा फायदा होईल हे मात्र नक्की.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here