बावडा: श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित कै शहाजीराव पाटील आश्रमशाळा बावडा या ठिकाणी आश्रम शाळेला सोलर वॉटर हीटर हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. कै. सीमा विजय जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण स्मृतिप्रीत्यर्थ आश्रम शाळेला 1000 लिटरचा सौर ऊर्जा सोलर वॉटर हीटर भेट म्हणून दिला. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा गरम पाण्याचा प्रश्न यामुळे कायमचा मार्गी लागलेला आहे. कार्यक्रमासाठी मा. ना.श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब व प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार अकलूज आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. इनामदार मॅडम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते सोलर वॉटर हिटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जगताप कुटुंबियांचा सत्कार आदरणीय भाऊ व डॉ. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.डॉ. इनामदार यांनी काही आजार असे असतात. की तेथे डॉक्टरही काही करू शकत नाहीत. अशी खंत व्यक्त करून बी.पी. मधुमेह अशा आजारांकडे दुर्लक्ष करू नका असा उपस्थितांना सल्ला दिला. ह.भ.प. डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनीही पुण्यस्मरण याचा सविस्तर अर्थ स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात आदरणीय भाऊंनी जगताप कुटुंबियांचे भरभरुन कौतुक केलं आणि सामान्यासमोर एक आदर्श मांडला की अनाठाई खर्च न करता सामाजिक उपक्रमांतर्गत खर्च केल्यास समाजातील उपेक्षित घटकांच्या गरजा भागतात. त्याबरोबर डॉ. इनामदार यांच्या जिद्द चिकाटी आणि सामान्यांसाठी अविरत सेवा करणारे माणसातील देव,अनेकांना जीवदान मिळवून देणारे ग्रामीण भागातील एकमेव डॉक्टर आहेत असेही गौरवोद्गार काढले.सदर कार्यक्रमास मा. श्री उदयसिंह पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक भाऊ घोगरे सरपंच, मा. श्री किरण काका पाटील, उपसरपंच श्री निलेश घोगरे ,ह भ प डॉ. आसबे सर, श्री महादेवजी घाडगे, श्री पंडितराव पाटील , श्री उमेश बापू सुर्यवंशी , श्री संतोष सुर्यवंशी , श्री स्वप्निल घोगरे, डॉ. जयशंकर विभुते,माजी उपसरपंच श्री अमोल घोगरे , कै शहाजीराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोगरे सर व इतर मान्यवर आणि समस्त जगताप परिवार उपस्थित होते. कार्यक्रमात श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका वर्ग, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग , आश्रम शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक श्री राहुल जगताप यांनी केले अध्यक्षीय सूचना प्राचार्य श्री घोगरे डी आर सर यांनी मांडली त्यास अनुमोदन प्राचार्य श्री वावरे सर यांनी दिले. आभार सौ आरती जगताप मॅडम यांनी मानले. सूत्रसंचालन श्री मुलानी एस टी सर यांनी केले हा कार्यक्रम आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेला होता.
Home Uncategorized विजय जगताप यांचेकडून हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्या उपस्थित कै.शहाजीराव पाटील आश्रम शाळेस (बावडा...