विकासकामांच्या निधीशी राष्ट्रवादी काँग्रेसचा अथवा त्यांच्या आमदाराचा काडीमात्र संबंध नाही- भाजपाचे शरद जामदार

इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध – अँड.शरद जामदार
हर्षवर्धन पाटील यांनी आणला रु.13 कोटींचा निधी
इंदापूर : प्रतिनिधी दि.27/6/23
इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकारकडून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रु.13 कोटींचा निधी आणला आहे. सदरच्या कार्यक्रमांस भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना इच्छा असूनही व्यस्त कामांमुळे येता आले नाही. सदर कामांची भूमिपूजने जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील यांनी दहा दिवसांपूर्वी दि.18 जून रोजी केली असून, ती नियमानुसार आहेत. इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असून, सदरच्या विकास कामांच्या निधीशी राष्ट्रवादी काँग्रेसचा अथवा त्यांच्या आमदाराचा काडीमात्र संबंध नाही, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी मंगळवारी दि.27 दिले.
हर्षवर्धन पाटील यांनी केलेली भूमिपूजने बेकायदेशीर असल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोमवारी दि. 26 केला होता. त्यास भाजपकडून अँड. शरद जामदार यांनी प्रत्युत्तर दिले. इंदापूर शहराच्या विकासासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नातून शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून रु.10 कोटींचा निधी दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नगर विकास विभागाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत रु. 3 कोटीचा निधी दि.17 मार्च 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे. सदरच्या एकूण रु. 13 कोटीच्या निधी मंजूरीची पत्रे शासनाने हर्षवर्धन पाटील यांना दिली आहेत.
सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरवासीयांच्या वतीने अभिनंदन करीत, सर्व विकासकामांची भूमिपूजने नियमानुसार केली. इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप सरकार हे भरीव निधी देत असलेबद्दल विरोधकांनी स्वागत करायला हवे होते, असा टोला यावेळी तालुकाध्यक्ष अँड.जामदार यांनी लगावला.आगामी काळातही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेना-भाजप सरकारकडून इंदापूर शहर व तालुक्याच्या विकासाठी भरघोस निधीचा ओघ कायम राहणार आहे,असे यावेळी तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी नमूद केले.



नरसिंहपुरला साधा पोलीसही उपस्थित नव्हता :
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूरला राज्य शासनाच्या गृह विभागाच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे गुपचूप उद्घाटन खा.सुप्रिया सुळे यांनी दि.5 जून रोजी बेकायदेशीरपणे केले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणतात त्यानुसार खा.सुळे यांनी राजशिष्टाचार पाळला का?त्यावेळी उद्घाटनास साधा पोलीसही उपस्थित नव्हता. सदरच्या बेकायदेशीर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रदीप गारटकर यांनी नीरा नरसिंगपूर पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटना संदर्भातही बोलले पाहिजे, असे यावेळी अँड. शरद जामदार यांनी स्पष्ट केले.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here