बावडा पोलीस स्टेशनच्या टीमची दमदार कामगिरी.. सुमारे 75 शेळ्या/बोकड चोरणारी पॉयझन नावाची टोळी गजाआड.

गेल्या वर्षीपासून इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये शेळ्या बोकडे चोरण्याचे प्रमाण वाढलेले होते. अनेक गोरगरीब तथा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या शेळ्या मेंढ्या बोकडे चोरल्याने शेतकरी हतबल झाला होता आणि इंदापूर पोलीस स्टेशनला एक या चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान तयार झाले होते.
अखेर बावडा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ही चोरांची टीम पकडण्यात यश आले असून तीन मुख्य आरोपी तथा दोन अल्पवयीन मुलांना जेरबंद करत तब्बल 10 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की,इंदापुर पोलीस स्टेशन अंकीत बावडा पोलीस दूरक्षेत्र, निमगाव केतकी, सरडेवाडी या परीसरात शेतक-यांचे शेळया बोकड चोराचे वाढते प्रमाणाचे अनुषांगाने इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा दिलीप पवार यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्र तपास पथकातील सपोनि नागनाथ पाटील, सहा फौजदार शिंदे, पो. ना. गायकवाड पो.अं विनोद लोखंडे पो अं आरीफ सयद, विकम जमादार यांना बोलावुन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्याने सपोनि नागनाथ पाटील व बावडा तपास पथकाने प्राप्त माहीतीच्या आधारे १) मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे २) पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले हे दोघे रा रेडा ता इंदापुर जि पुणे तसेच ३). निलेश बाबासाहेब सरवदे रा काटी ता जि पुणे व दोन विधीसंघर्ष बालक(अल्पवयीन मुले) यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यानी १० ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांचेकडुन इंदापुर पोलीस स्टेशनचे १७ गुन्हे उघड करून चोरीमधील ५३५०० /- चा रोख रक्कम मुददेमाल जप्त केला आहे. इंदापुर पोलीस स्टेशन उघड झालेले गुन्हयाची यादी खालील प्रमाणे, १) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ७९९ / २०२२,भा.द.वि. कलम ३७९,२) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ११२६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९,३) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ११२५ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ ४ इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं १०३४/२०२२ भा.द.वि. कलम ३७९,५) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ९४३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९,६) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ५८ / २०२३ भा. द. कलम ३७९,७) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं २४२ / २०२३ भा. द.वि. कलम ३७९,८) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं २७२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,९) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ३०५ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,१०) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,११) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ५१२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,१२) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६३ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,१३) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ६७५ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,१४) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ७२७/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,१५) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ७३१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,१६) इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ १७ इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं २४० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण श्री अंकीत गोयल सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो, मा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा पोलीस उपनिरीक्षक के.बी शिंदे, पो. हवा जाधव पो. ना कदम, पोना कळसाईत, पो ना गायकवाड पो. ना हेगडे पो अंमलदार अकबर शेख. विक्रम जमादार, गणेश डेरे, विनोंद लोखंडे नंदु जाधव व आरीफ सयद यांनी केली.पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here