वालचंदनगर (आनंदनगर) येथे मुस्लिम बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली.

वालचंदनगर:(प्रतिनिधी:अभिजीत खामगळ) गुरुवार दिनांक १४-४-२०२२ रोजी आनंदनगर ता.इंदापूर या गावातील मुस्लिम बांधवांनी अतिशय अभिनंदनिय व उत्साही वातावरणात विश्वरत्न,प्रज्ञासूर्य, बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राजू जाधव व जिवलग बाॅईज यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात आले.तसेच त्यानंतर त्रिसरण पंचशील सामुदायिक घेण्यात आले .व उपस्थितीतां मधून सोहम जाधव या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.तसेच पल्लवी कोकरे ,काजल बनसोडे,कुणाल बनसोडे ,जि प शाळा जंक्शन चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बनसोडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व महाराजा गृपचे अध्यक्ष राजू जाधव आणि पुंडलिक सोनवणे सर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्यावर आपले मनोगतातून प्रकाश टाकला.त्यावेळी मुस्लिम समाजातील शब्बीर डांगे,सुलतान मुजावर, बाशुद्दिन शेख, ताजुद्दीन शेख, हाजुद्दीन शहरवाले ,गुलाब मुलानी ,उस्मान सय्यद,सागर गेजगे,राकेश कोकरे, विनोद झेंडे,बाळू गायकवाड, बाळू कोळी, महादेव भोसले,पंकज बनसोडे ,जिवलग बाॅईज गृपचे सर्व सदस्य आणि सर्व मुस्लिम महिला भगिनी व सर्व समाजातील महिला भगिनी उपस्थितीत होत्या .शेवटी सर्व उपस्थितीतांचे आभार शब्बीर डांगे यांनी मानले व त्यानी सांगितले की पुढील काळात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव साजरा करतील असे जाहीर करतो . सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुंडलिक सोनवणे सर यांनी केले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here