👉 इंदापूर शहरानजीक बाजार समितीच्या समोर अठ्ठावीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या.
इंदापूर शहरानजीक इंदापूर अकलुज मार्गावर बाजार समितीच्या समोर एका अठ्ठावीस वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी घडली आहे.संजय दशरथ मोरे वय २८ वर्षे असं आत्महत्त्या करणाऱ्या युवकाचं आहे.या संदर्भात इंदापूर पोलिसांत रात्री उशीरा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र वारकरी सांप्रदायातील एका तरूणाच्या आत्महत्तेमुळे इंदापूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.सबंधित मयत तरूणाच्या बहिणीने या संदर्भात इंदापूर पोलिसात आपली तक्रार नोंदवली असून मयत संजय यास एका युवकाने गुरुवारी दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास मयत संजय याच्या घरासमोर शिवीगाळ,दमदाटी केली. शिवाय फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सदर आरोपी व त्याचा अनोळखी साथीदाराने यापूर्वी शहरातील एका हाॅटेल व तापी सोसायटी येथे शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथाबुक्क्याने मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.या संदर्भातला अधिक तपास इंदापूर पोलीस स्टेशन येथे चालू आहे..