इंदापूर तालुक्यातील शहा गावचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले शहा गावचे उपसरपंच माननीय श्री दिलीप (बापू) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 9 /1/2022 रोजी भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन शंभू महादेव मित्र मंडळ शहा येथे केले आहे. हा कार्यक्रम कोरोना चे सगळे नियम पाळून केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलतानी शहा गावचे उपसरपंच माननीय श्री दिलीप (बापू) पाटील यांनी केले आहे. हा कार्यक्रम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा, व माननीय श्री प्रदिप दादा गारटकर ,यांच्या शुभहस्ते होणार आहे. इंदापूर तालुक्यातील सगळेच दिग्गज नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत .आपणही सर्वजण रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी विनंती दिलीप (बापू )पाटील यांनी केली आहे. दिलीप बापू पाटील यांचा सगळीकडेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी सोडवणे मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून नुकतीच निवड झाली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिलीप बापूंच्या दांडग्या संपर्काचा नक्कीच फायदा होईल अशी चर्चा चालू आहे.