वडापुरी गावचा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ता अमोल पासगे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मा. राज्यमंत्री दत्तात्रय (मामा )भरणे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा ही दिल्या. अमोल पासगे पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात एक पाऊल पुढे आहेत. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी ते नेहमीच मदतीला धावून जातात .सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सामाजिक कामातही त्यांचा वाटा मोठा आहे .आणि त्याच कामाच्या जोरावर त्यांचा वडापुरी व वडापुरी पंचक्रोशीत मोठा दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे .आणि हेच त्यांचे कामाचे कौशल्य बघून त्यांना आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवीन निवड झालेल्या अमोल पासगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी वडापुरी गावचे सरपंच शिवाजीराव तरंगे ,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, गोखळीचे सरपंच सचिन तरंगे, तरंगवाडी चे सरपंच तात्यासाहेब करे ,सुरज पासगे, संतोष पासगे ,आप्पाजी पासगे ,दीपक पासगे ,तेजस पासगे ,सोन्या पासगे, सागर पासगे ,दादा पासगे ,यांच्यासह वडापुरी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized वडापुरी गावचे अमोल उत्तम पासगे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका...