वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्वामुळेच महाराष्ट्र शक्तीशाली- शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे.

इंदापूर: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्वामुळेच महाराष्ट्र शक्तीशाली झाले आहे असे मत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादन करताना व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढताना ते म्हणाले की बाळासाहेबांमुळेच शिवसेनेचे भगव वादळ मुंबई नंतर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पसरले आहे. त्यांचा दरारा इतका मोठा होता की, जेव्हा बाळासाहेब ठाकरे बंदची हाक देत असत, तेव्हा शहरात एक पानही हलत नसे.कोणत्याही स्थानिक राजकारणी नेत्याची इतकी ताकद आजवर या महाराष्ट्राने पाहिली नाही असे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन म्हणाले की,महाराष्ट्रातील मराठी तरुणांना नोकऱ्यांपासून ते इतर सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून बाळासाहेबांनी जो लढा दिला त्यामुळेच 1990 पर्यंत शिवसेनेने महाराष्ट्रात चांगली पकड निर्माण केली होती. 1995 साली भाजप-शिवसेना युती होऊन महाराष्ट्रात नवे सरकारही आले. बाळासाहेबांना हवे असते तर तेे भारतातील कोणत्याही पदावर विराजमान होऊ शकले असते, पण त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब नेहमीच किंगमेकरच्याच भूमिकेत राहिले. असे मत विशाल बोंद्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी विशाल बोंद्रे शिवसेना जिल्हा समन्वय,नितीन शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख, अरूण पवार शिवसेना तालुका समन्वयक, महादेव सोमवंशी शहर प्रमुख, वसंत आरडे, दुर्वास शेवाळे शहर संघटक, उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के, उपशहर प्रमुख दादा देवकर, उपशहर प्रमुख बंडू शेवाळे, अंकुश गलांडे विभाग प्रमुख,संतोष क्षिरसागर उपशहर प्रमुख, शाखाप्रमुख सुरवड हनुमंत कांबळे, महादेव देवकर रेडा शाखाप्रमुख प्रमुख,इत्यादी उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here