रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब पुणे रिव्हरसाईड तर्फे वॉचमन व सुरक्षा रक्षक यांना ब्लँकेट वाटप.

भिगवण: कडक आता अशा कडाक्याच्या थंडीत सुद्धा रात्री खाजगी व सरकारी बँक यांची सुरक्षारक्षक तसेच विविध सोसायटीमधील वॉचमन असे भिगवण परिसरातील लोकांना रोटरी क्लब भिगवन तर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले. यामधे पुण्याच्या सिनर्जी डायरेक्टर पल्लवी साबळे यांनी मदत केली.
यावेळी बोलताना रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की रात्री चे वॉचमन किंवा पहारेकरी यांनी शेकोटी साठी वापरलेले टायर किंवा लाकूड हे जाळून धूर केल्याने पर्यावरणासाठी घातक ठरत आहे म्हणून ते न करता त्यांच्यासाठी उबदार ब्लँकेट वाटप करत आहोत. यावेळी सचिन शेठ बोगावत तसेच रियाज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संपत बंडगर ,संजय रायसोनी ,किरण रायसोनी, डॉ अमोल खानावरे, मनोज अण्णा राक्षे तसेच पत्रकार दादासाहेब थोरात, तुषार क्षीरसागर, निलेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संतोष सवाणे ,नामदेव कुदळे ,औदुंबर हुलगे व प्रदीप वाक्षे यांनी केले. आभार रोटरी क्लब च्या सेक्रेटरी सौ सुषमा वाघ यांनी मानले. रोटरी क्लब चे आणखी एक कौतुकास्पद कार्य लिंक वर पहाhttps://janataexpressmarathinews.com/रोटरी-क्लबच्या-माध्यमातू/
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here