महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर, सरकार परत आलं असतं, असं महत्त्वाचं विधान सुप्रीम कोर्टाने केलं आहे..शिंदे सरकार बचावलं आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा. सध्या तरी युती सरकारला कोणताही धोका नाही असं म्हणावे लागेल.