इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील मौजे रेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सदाशिव मोहिते वय (५१ वर्ष)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रेडा गाव व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
त्यांच्या पश्चात चार बहिणी,दोन मुले,पत्नी,भाऊ,सुना,तीन पुतणे असा परिवार आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांचे ते चुलते होते.रेडा गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळला.