आशिया कप या भव्य स्पर्धेतील भव्य सामना भारत विरुद्ध पाकिस्तान आज खेळवला जाणार आहे.केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमी, क्रिकेटचाहते या महामुकाबल्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. इंदापुरातही क्रिकेट खेळाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन राहुल गुंडेकर यांनी इंदापूर तालुक्यातील क्रिकेट रसिकांसाठी खास राहुल सिनेमा इंदापूर येथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेटचा सामना मोठ्या पडद्यावर दाखवायचं ठरवलं आहे.
आज रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता T20 क्रिकेटचा आनंद घेता येईल. आकर्षक डॉल्बी सिस्टम व एसी सुविधा असल्यामुळे प्रेक्षकांना राहुल सिनेमांमध्ये क्रिकेट पाहायला अधिक आनंद येणार आहे.क्रिकेट रसिकांनी त्वरित बुकिंग करण्यासाठी 8180088008 या नंबर वर कॉल करून आपले सीट बुक करण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे राहुल सिनेमाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था ही मोठ्या स्वरूपाचे असल्याने वाहतूक कोंडी होत नाही.गेल्या अनेक वर्षापासून रोमहर्षक सामने असतील तर ते पाहण्यासाठी राहुल सिनेमा हे आपल्या मोठ्या पडद्यावर सोय करत असतात. याआदी T20 वर्ल्ड कप असेल किंवा वनडे मॅचच्या वर्ल्ड कपच्या रोमहर्षक सामने असतील हे सर्व सामने इंदापूरकरांसाठी राहुल सिनेमा यांनी डॉल्बी सिस्टमसह मोठ्या पडद्यावर दाखवण्याची व्यवस्था केली होती.
आशिया कप 2022 स्पर्धेतील हा दुसराच सामना असून दोन्ही संघाचे नेमके कोणते शिलेदार मैदानात उतरु शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यावेळी भारतीय संघाचा विचार करता कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल सलामीला येऊ शकतात. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव या तगड्या फलंदाजांची फळी असेल. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत संघात असेल. तर त्यानंतर अष्टपैलूंच्या फळीत हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा असू शकतात. युजवेंद्र चहलच्या फिरकीसह भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि आवेश खान ही वेगवान गोलंदाजांचं त्रिकुट असण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पाकिस्तान संघाचा विचार केला तर त्यांच्या महत्त्वात्या गोलंदाजांची दुखापत मोठा चिंतेचा विषय आहे. यामध्ये आधी शाहीन शाह आफ्रिदी नंतर मोहम्मद वासिम ज्युनियर यांना दुखापत झाल्याचं दिसून आलं.आता जर संघाचा विचार केला तर सलामीला कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान मैदानात येऊ शकतात.फखर जमान, इफ्तिखार अहमद, हैदर अली, खुशदिल शाह यांच्यानंतर अष्टपैलू शादाब खान, मोहम्मद नवाज येतील. मग गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद हसनैन, हारिस रौफ आणि शाहनवाज दहानी यांच्यावर असेल.
संभाव्य अंतिम 11 खेळाडू यादी
भारत:-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तान:-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, हैदर अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ, शाहनवाज दहानी